अर्जून कपूरचा ‘लाइट…कॅमेरा ..’ कॅप्शन असलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल

arjun

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन शूटसाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘लाइट…कॅमेरा…अक्शन’ असे कॅप्शन दिले असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेता अर्जुन सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अर्जुनच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींनीही कमेंट केली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या कमेंटने वेधले आहे. मलायकाने फायर इमोजी वापरत अर्जुनची स्तुती केली आहे.

या व्हिडिओत त्याची हटके हेअरस्टाईल दिसत आहे. यामुळे त्याची ही स्टाईल चाहत्यांना आवडत आहे. त्याच्या लूकवर देखील बरेच कमेंटस‌ येत आहेत.  गेल्या  आठवड्यात अर्जुनने एसयूव्ही खरेदी केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अर्जुनचा ‘भूत पोलीस’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. याशिवाय अर्जुन कपूर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे. त्याच्या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंटस देत आहेत.

महत्वाच्या बातम्या :