मुंबई : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे जोडपं सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अर्जुन आणि मलायका यांनी २०१९ मध्ये सोशल मीडियावरून आपल्या नात्याचा खुलासा केला होता. नुकताच अर्जुनचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या निमित्तानं एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबतच्या नात्यावर मोठं विधान केलं आहे.
त्या दोघांमधील वयाच्या अंतरावरून त्यांना कायम ट्रोल केले जाते. ट्रेलर लॉंचच्या वेळी कार्यक्रमात अर्जुन म्हणाला की, “तुमच्या कहाणीमध्ये कधी तुम्हाला हिरो व्हावं लागतं तर कधी व्हिलन. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यातले हे परिणाम वेगवेगळे असतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा ते प्रामाणिक असावं असा तुमचा हट्ट असतो. त्यामुळे कधी तुम्ही एका बाजूने एका व्यक्तीसाठी हिरो असता तर दुसऱ्या व्यक्तीसाठी व्हिलन ठरता.”
दरम्यान, मलायकाने अर्जुन कपूरचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला आहे. नुकताच अर्जुनने त्याचा ३७ वा वाढदिवस मलायकासोबत पॅरिसमध्ये साजरा केला.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<