तनुश्रीचे आरोप खरे असेल तर ती नक्कीच ही लढाई जिंकेल – अर्जुन कपूर

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधून अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली होती. आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर तनुश्रीच्या मदतीला धावून येत प्रतिक्रिया दिली आहे.

‘तनुश्री दत्ताप्रमाणेच माझ्या दोन बहीणी बॉलिवूड मध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे महिलेची सुरक्षितता काय असते हे मला चांगलंच कळते. देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे, त्या सुरक्षित कशा राहतील हे पाहणं आपली जबाबदारी आहे. आज एका महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. सत्य परिस्थिती समोर आणायचा ती प्रयत्न करत आहे. जर तिने केलेले आरोप खरे आहेत तर ती नक्कीच ही लढाई जिंकेल. मात्र त्यासाठी तिचं म्हणणं आपण नीट ऐकून घेतलं पाहिजे’, असं अर्जुन म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘महिलांवर होणारे अत्याचार हे केवळ कलाविश्वातच नाही तर अनेक क्षेत्रांमध्येही होत असतात. मात्र महिलांनी पुढाकार घेऊन आपलं मत मांडलं पाहिजं.