‘इशकजादे’ नंतर ‘संदीप और पिंकी फरार’मध्ये ‘ अर्जुन-परिणीती पुन्हा एकत्र

मुंबई: अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘संदीप और पिंकी फरार’ या सिनेमात हे दोघे पुन्हा दिसणार आहेत. या सिनेमाची कथा देशातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये राहणा-यांची आहे. तसेही या सिनेमाचे टायटल इतकं हटके आहे.

‘पुन्हा एकदा हा माझा पहिलाच सिनेमा असल्यासारखं वाटतंय. ही अशा तरूण-तरूणीची कथा आहे जे नेहमी ऎकमेकांसोबत भांडत असतात आणि दुसरीकडे ऎकमेकांशिवाय राहू सुद्धा शकत नाहीत’ असे बॅनर्जी यांनी म्हटलं.

अर्जुनने परिणीतीसोबतचा एक फोटो शेअर करून त्याने ट्विट केलं की, ‘पुन्हा एकदा परिणीतीसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.

You might also like
Comments
Loading...