दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता लक्ष प्रचारसभांच्या नियोजनावर लागले आहे. दिल्ली विजयासाठी भाजपने कंबर कसली असून महाराष्ट्रातील नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

कालपासून महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. राज्यातून एकूण 25 जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे कालपासूनच दिल्लीला प्रचारासाठी रवाना होणार आहेत. तर चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत.

Loading...

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्रचाराला गेलेल्या विनोद तावडेंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करणारे आता दिल्लीला प्रचाराला आले आहेत, अशा शब्दात केजरीवाल यांनी तावडेंचा समाचार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

महाराष्ट्राचे तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्या आहेत आणि आता हेच तावडे दिल्लीत प्रचाराला आले आहेत, असं ट्वीट केजरीवाल यांनी केलं आहे.दरम्यान, आपण खूप मेहनत करून दिल्लीच्या शासकीय शाळांना जपलंय आणि मोठं केलंय. प्रचारासाठी आलेल्या तावडेंना आपल्या शाळा दाखवा छोले भटुरे खायला घाला कारण ते आपले पाहुणे आहेत, असा टोला केजरीवाल यांनी विनोद तावडेंना लगावला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात