भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद; 16 वर्षाच्या मुलीची उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या

sucide

मुंबई – मुंबई मध्ये एका 16 वर्षीय मुलीनं भावाबरोबर झालेल्या क्षुल्लक वादावरून धक्कादायक पाऊल टाकले आहे. तिने थेट आपले जीवन संपवले आहे. कारण ऐकून तुम्हाला देखील चांगलाच धक्का बसणार आहे. 16 वर्षीय मुलीचा आपल्या भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला आहे. त्यानंतर तिने त्या रागात उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली आहे.

शुक्रवारी रात्री संबंधित मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन मोठा वाद झाला होता. तिच्या भावाने त्या मुलीला मोबाईल न दिल्याने राग अनावर होऊन तिने उंदीर मारण्याचे औषधं प्यायले. त्या मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि उपचार सुरु केले. पण दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या मुलीचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तो मृतदेह कुटुंबाच्या हवाली करण्यात आला.

समंथा नगरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे यांनी सांगितलं की, ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली आहे. संबंधित मुलीचा तिच्या लहान भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला. त्यामुळे रागीट स्वभावाच्या या मुलीने जवळच्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध आणलं आणि ते लहान भावासमोरच प्यायली. त्यानंतर लहान भावाने आपल्या आई-वडिलांना याची कल्पना दिली. त्यानंतर त्या मुलीला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलं. उपचार सुरु असताना या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आणखी पोलीस तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :