मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल (Shubhaman Gill) एकमेकांना डेट (Date) करत असल्याचा चर्चा सध्या सुरू आहेत. सारा आणि शुभमनला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलेले आहे. सारा आणि शुभमन त्यांच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. अशा परिस्थितीत दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर शुभमन गिलने मौन सोडत याबद्दल माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिल याने नुकताच प्रसिद्ध पंजाबी चॅट शो ‘दिल दिया गल्ला’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. प्रीती आणि नीती सिमोजच्या या लोकप्रिय शोमध्ये होस्ट सोनम बाजवाने शुभमन गिलला अनेक प्रश्न विचारले. सोनमने शुभमनला बॉलीवूड मधील सगळ्यात फिट अभिनेत्री कोणती आहे? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर द्यायला एक क्षणाचा विलंब न करता शुभमनने सारा अली खानचे नाव घेतले. दरम्यान सोनमने त्याला लगेच पुढचा प्रश्न विचारला की, “तू आणि सारा अली खान डेट करत आहात का?”. शुभमनने या प्रश्नाचे उत्तर देत सुरू असलेल्या चर्चांवर मौन तोडले आहे.
शुभमन गिल याने या प्रश्नावर “कदाचित” असे उत्तर दिले आहे. त्यानंतर होस्टने शुभमनला “सारा का सारा सच बोलो” असं म्हणत प्रश्न विचारला. या प्रश्नाचे कोड्यात उत्तर देत शुभमन म्हणाला की, “सारा का सारा सच बोल दिया, कदाचित हो,कदाचित नाही.” शुभमनने या प्रश्नाचे खुलेपणाने उत्तर दिले नसल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखीनच उधान आलं आहे. कारण त्याने असल्याचं किंवा नसल्याचं असं काहीही म्हटलेलं नाही. त्यामुळे शुभमन आणि सारा डेट करत आहे की नाही याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही.
टीम इंडियाच्या या वर्षी वेस्टइंडीज दौऱ्यावर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि शुभमन एकत्र दिसले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये दिल्लीत एका ठिकाणी हॉटेलमधून बाहेर पडताना सारा आणि शुभमन दिसले होते. अशा परिस्थितीत दोघांकडून त्यांच्या नात्याबद्दल कुठलीही पुष्टी झालेली नसल्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल बोलणे चुकीचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- Amruta Fadanvis | आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व – अमृता फडणवीस
- Sanjay Raut Birthday | “रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे…”, संजय राऊतांना रोहित पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Vinayak Raut | “येत्या सहा महिन्यात १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार” ; विनायक राऊत यांचा दावा
- Amruta Fadanvis | “…म्हणून मोदी आणि वरच्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं”; अमृता फडणवीसांनी सांगितलं कारण
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यन करणार अक्षय कुमारला रिप्लेस?