मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात निर्जीव पुतळे बसले आहेत का ? – अजित पवार

अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल 

टीम महाराष्ट्र देशा – धर्मा पाटील या वयवृद्ध शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. मंत्रालयाचे आत्महत्यालय झाले आहे. सरकारने यातून मार्ग काढण्याचे सोडून मंत्रालयात जाळ्या लावल्या. हे सरकारच पूर्ण फाटलं आहे कुठे कुठे ठिगळं लावणार?अशी सरकारवर जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना केली. हे सरकार लोकांच्या समस्यांबाबत गंभीर नाही. लोकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. सभागृह चालू दिले जात नाही. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात निर्जीव पुतळे बसले आहेत की काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल

हे सरकार लोकांच्या समस्यांबाबत गंभीर नाही. लोकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. सभागृह चालू दिले जात नाही. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात निर्जीव पुतळे बसले आहेत की काय असे वाटते. मंत्रालयात आत्महत्या होते तर मंत्री दखलही घेत नाहीत. सरकारमधील मंत्री निगरगट्ट आहेत. तरूणही मंत्रालयात आत्महत्या करतायत. हे सरकार काय करत आहे? जिल्हाधिकारी काय करत आहेत? लोकांची कामे का रखडली आहेत? सरकारनी कामे केली तर लोक का आत्महत्या करतील?अशी टीका पवार यांनी केली.

अधिवेशन संपण्याआधी महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली हे या सरकारने सभागृहात सांगावं. सरकारचंच मन खात आहे म्हणून मुद्दाम कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवली जात आहे. पण सरकार चूक मान्य करायला तयार नाही.या सरकारच्या कालखंडात शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरं जावं लागलं, बोंडअळी आली, गारपीट झाली, कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचा जीव गेला. त्यात विमाकंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. सरकारनीच आता विमा कंपनी काढावी अशी सूचना देखील त्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...