वीज बिले आहेत कि खंडण्या ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यात आंदोलन

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर आलेल्या लॉक डाउन मुळे सर्वसामान्यांना हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जात असताना मा मु उद्धव ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे . वीज बिले आहेत कि खंडण्या ? असा जाब विचारून मनसे , पुणे शहर ने गेल्या आठवड्याभरापासून महावितरण व ऊर्जा मंत्र्यांविरोधात या विरोधात मोहीम उघडली आहे.

‘आपली कुवत पाहून बोलावं’, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याने पडळकरांना झापलं

रोजगार धंद्यांची वानवा आणि आखडते उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉक डाउन च्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत अशी लेखी मागणी मनसे तर्फे या पूर्वीच मा.मुख्यमंत्री , मा. ऊर्जा मंत्री व महावितरण चे मुख्य अभियंता यांकडे केली आहे . आणि सदर निर्णय होईपर्यंत महावितरण ने नागरिकांमागे वसुलीचा तगादा लावून त्यांच्या मीटर ला हाथ लावला तर म न से आपल्या पद्धतीने त्यांचा सामना करायला समर्थ आहे असा इशाराही महावितरण ला देण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली . सरकारने नुसत्या पोकळ घोषणा न करता खंडणी स्वरूपात वसूल केली जाणारी वाढीव वीज बिल तातडीने रद्द करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा म न से यापुढे आक्रमकपणे भ्रष्ट आणि लुटारू सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल असे यावेळी जाहीर केले .

चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ६१७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १९९ कोरोना बाधित

याप्रसंगी प्रल्हाद गवळी , प्रशांत मते , राहुल गवळी , विक्रांत अमराळे ,वसंत खुटवड , सुनील कदम अभिषेक थिटे , राकेश क्षीरसागर , धनंजय दळवी , रोहन उभे , मनोज ठोकळ , उदय गडकरी ,आकाश धोत्रे , शेखर बाळे इत्यादी अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते