Instagram- इन्स्टाग्रामवर आर्काईव्हची सुविधा

इन्स्टाग्रामने आता आपल्या युजर्ससाठी हवी ती पोस्ट आर्काईव्हच्या माध्यमातून संग्रहीत करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात प्रतिमा शेअर केल्या जातात. यातील काही प्रतिमा अपलोड केल्यानंतर युजरला त्या नकोशा असतात. अर्थात तो या डीलीट करू शकतो. मात्र काही युजर्सला इतरांना संबंधीत पोस्ट न दिसता ती एका स्वतंत्र विभागात संग्रहीत असावी असे वाटते. अर्थात आपल्या न्यूजफिडमध्ये न दिसणार्‍या पोस्ट आर्काईव्हच्या माध्यमातून सुरक्षितपणे एकाच ठिकाणी संग्रहीत करण्यासाठी इन्स्टाग्रामने स्वतंत्र सुविधा प्रदान केली आहे. कोणतीही पोस्ट आर्काईव्ह करण्यासाठी त्याच्या वर असणार्‍या तीन टिंबांवर क्लिक करून आर्काईव्ह या पर्यायावर क्लिक करावे. या संग्रहीत झालेल्या पोस्टमध्ये ङ्गशो ऑन प्रोफाईलफ हा पर्याय देण्यात आला आहे.