आर्चीच्या एन्ट्रीने लोक सैराट; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अरची

नांदेड : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

यातच आर्चीचे एन्ट्री म्हटली की नागरिक सैराट होणार हे नक्की. मात्र कोरोनाच्या काळात हाच प्रकार सहा जणांना महागात पडला आहे. सैराट चित्रपटानंतर आर्ची-परश्याची जोडी लोकांनी डोक्यावर उचलून घेतली. आजही ही जोडी कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचं कळतं तरी मोठी गर्दी जमा होते. मात्र चाहत्यांचं हे वेड कोरोनाला पूरक ठरू शकतं, याचा विसर पडल्याचं दिसत आहे.

कोविड नियमांचे पालन न केल्याने नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहूर तालुक्यातील सारखणी येथे लेंगी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लेंगी महोत्सवाला सैराट फ्रेम आर्चीला म्हणजेच रिंकू राजगुरू हिला बोलावल्यात आलं होतं. 16 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर्चीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.

या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मास्कचा वापर केला नव्हता, असं चित्र आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक नियम आणि भादंवीच्या कलम 188, 269, 270 आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या