MCA Elections | मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीच्या पूर्वसंध्येला विशेष डिनर आयोजीत करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटातील मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील यावेळी उपस्थित होते. पवार आणि शेलार पॅनल देखील या स्पर्धेत उतरले आहे. राजकारणात एकमेकांचा कट्टर विरोध करणारे भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले. राष्ट्रवादीकडून शिंदे गटावर देखील टीका होते. ते देखील डिनरमध्ये सहभागी झाले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गढूळ करुन आम्ही क्रिकेटमध्ये राजकरण करत नसल्याच्या गप्पा हे राजकारणी करतात. कारण स्पष्ट आहे, कारण MCA म्हणजे आर्थिक उलाढालीचे केंद्रबिंदू या पैशांसाठी हे कट्टर विरोधक मतभेद विसरुन एकत्र आले.
शिवसेनेत बंड झाल्यापासून राज्यातील राजकारण बदलेले आहे. राजकीय नेते सोडा कार्यकर्त्यांचे देखील विभाजन झाले आहे. ठाकरे गट, शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर तुफान शाब्दीक मारामारी करतात. शिंदे गट आणि ठाकरे गटाने कार्यकर्ते प्रत्यक्षात देखील आमने-सामने आले होते. त्या सर्व कार्यकर्त्यांनी विरोधक-सत्ताधारी यांच्या डिनरचे फोटो पाहावे. एकमेकांच्या जीवावर उठलेले हे राजकारणी पैश्यासाठी एकत्र आले आहेत. यांनी आधी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही. मग हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये करणार काय?, जरी हे म्हणत असले आम्ही खेळात राजकारण आणत नाही. पण राजकारण यांचा पिंड आहे. एखाद्या माजी क्रिकेटरला अध्यक्ष बनवायला यांना कोणी रोखलं?. पण पैसा भरमसाठ येणार आहे म्हटल्यावर हे सर्व एकत्र झाले. हे देशाच्या विकासासाठी असेच एकत्र येतील का? असा प्रश्न आता सामान्य मतदाराच्या मनात निर्माण झाला आहे.
Contents
MCA कडे सुमारे पाचशे कोटी रुपये येणार-
राजकीय व क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार तीन वर्षांमध्ये MCA कडे सुमारे पाचशे कोटी रुपये येणार आहेत. त्यामुळे एकमेकांवर हल्ला करणारे राजकीय विरोधक एकत्र आले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे दोन्ही गट एकाच पॅनेलमधून MCA ची निवडणूक लढवत आहेत.
राजकीय नेत्यांची आर्थिक फायद्याची पंढरी-
मुंबई क्रिकेटची पंढरी म्हणून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला. ते राजकीय नेत्यांची आर्थिक फायद्याची देखील पंढरी आहे. सर्वांना आपीएलमध्ये होणारी पैशांची उलाढाल माहित आहे. बीसीसीआयला आपीएलमधून हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये संघमालक, राज्य संघटना भागिदार असतात. MCA ला दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये हे आयपीएलच्या नफ्यातून मिळत होते. तसेच तिकीट विक्री, स्टेडियममधील जाहिरातींच्या नफ्यातील वाटा देखील मुंबई संघटनेला मिळतो.
तीन वर्षांत शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी BCCI कडून मिळाला-
मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) गेल्या तीन वर्षांत शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी बीसीसीआयकडून मिळाला आहे. पुढील तीन वर्षांमध्ये या निधीमध्ये पाचपट वाढ होण्याची शक्यता आहे. कदाचित यामुळे राजकीय विरोधक एकत्र आले. आशिष शेलार बीसीसीआय खजिनदारपदी गेल्यामुळे मुंबई संघटनेला आणखी फायदा होणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकादरम्यान बीसीसीआयकडून एमसीएला अधिक अनुदान देण्यात शेलार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. याशिवाय, एमसीएला कसोटी मालिका आणि रणजी करंडक सामन्यांच्या तिकीटातून मोठा वाटा मिळू शकतो.
पवार-शेलार पॅनल कडून अमोल काळे रिंगणात –
एमसीए निवडणूक पवार-शेलार पॅनल विरुद्ध माजी स्टार क्रिकेटर आणि प्रशिक्षक संदीप पाटील होणार आहे. पवार-शेलार पॅनल कडून अमोल काळे अध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत. त्यामुळे काळे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी तीन दिग्गज तयारी करत आहेत. ही युती केवळ एमसीएवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुदान किंवा इतर स्त्रोतांद्वारे संस्थेसाठी महसूल वाढवण्यासाठी नाही तर राज्य सरकारशी विशेषत: आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी चांगले आणि वैधानिक संबंध निर्माण करण्यासाठी देखील असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “मी शपथ घेतो की…”, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ
- Nitesh Rane । “गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे, दिशा सालियान, सुशातसिंग राजपूत…”; नितेश राणेंच्या ट्विटने चर्चांना उधाण
- Ashish Shelar | “वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन आणि…”; अशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्ला
- Bank of Baroda Recruitment | बँक ऑफ बडोदा BOI मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती
- Dhanajay Munde | दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना मिळणार संधी?, भाऊ धनंजय मुंडे म्हणाले…