Aravind Sawant | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आनंदाचा शिधा आणि अन्य विषयांवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीपूर्वी खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
४० आमदारांना गाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोक वाट पाहत आहे. निवडणूक लागली की लोक त्यांना घरी बसवतील, असं म्हणत अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला फैलावर घेतलं आहे. माहिती अधिकाराअंतर्गत ‘वेदान्त फॉक्सकॉन’ प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेल्याच समोर आलं आहे. यावर अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी भाष्य केलंय.
सावंत म्हणाले, “संतोष गावडे नावाच्या मुलाने ३१ ऑक्टोंबरला पत्र लिहलं आणि तेव्हाच त्याला उत्तरही आलं. एमआयडीसीकडे उत्तर तयार होतच, फक्त कोणाच्या तरी पत्राची वाट पाहत होते,” असा चिमटा सावंत यांनी काढलाय.
“प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात गेला असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बैठका का घेतल्या. याप्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारची चिरफाड केली आहे. तसेच, समोरासमोर येऊन चर्चा करा, असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिलं आहे,” असंही अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs BAN T20 | भारताचे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्के ; बांगलादेशवर ५ धावांनी विजय
- Nana Patole | “कडू व राणांमध्ये हिश्श्याचं भांडण सुरूयं , ५० खोक्यांसाठी…”; नाना पटोलेंची सडकून टीका
- IND vs BAN T20 | पावसानंतर पुन्हा खेळ सुरु, बांगलादेशला विजयासाठी ५४ चेंडूत ८५ धावांची गरज
- Sambhaji Bhide । संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; कारणही केलं स्पष्ट, म्हणाले…
- Abdul Sattar | “आदित्य ठाकरे २ नंबरचे पप्पू” ; अब्दुल सत्तार यांची टीका