आराराsss खतरनाक! प्रविण तरडे नाचणार मनसेच्या भव्य दहीहंडीत

प्रविण तरडे

मुंबई : मागील वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्याने राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी सण, उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही दसरा, दिवाळीसारखे सणही अत्यंत साधेपणाने साजरे करावे लागणार का अशी परिस्थती आजही कायम आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हंटले की, ‘विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार’. या पोस्टवर प्रविण तरडेने ‘१०० टक्के नाचायला येणार’ कमेंट करत लिहिले आहे. त्यांच्या या कमेंट नंतर एकंदरीत असे लक्षात येते की, मनसेच्या दहीहंडी उत्सवाला प्रविण तरडे यांचे पूर्णतः पाठिंबा आहे.

pravin tarde, mns

कोरोनाचे सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करण्याचा मनसेचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी अनेक मंडळांना आवाहन देखील करण्यात आलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहन अभिजित पानसे यांनी केलं आहे. मनसेच्या या निर्धारामुळे आता राज्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP