सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा : राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-21च्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस खासदार विनायक राऊत, माजी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

Loading...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, मालवण नगरपरिषद येथे म्युझिकल फाऊंटन बसविणे, देवगड नगरपंचायत येथे पर्यटन सुविधा उपलब्ध करून देणे, मालवण नगरपरिषद क्षेत्रात ओपन जिम बसविणे आवश्यक आहे. असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

तसेच सायन्स सेंटर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांकरिता क्लासरूम आणि वाचनालय तयार करणे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इ-लर्निंग सुविधा पुरविणे, मालवण वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्रात बायोकंपोस्ट मशीन बसवणे, अपारंपरिक ऊर्जा योजनेअंतर्गत कामे करणे,आरोग्य, शिक्षण, सागरी मत्स्यव्यवसाय याकडे विशेष लक्ष देऊन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात