‘कन्हैया कुमार’ विरोधात खटला चालवण्यासाठी ‘केजरीवाल सरकार’ची मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा : अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार,उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. पोलिसांनी २०१६ च्या प्रकरणात कुमारसह अन्य दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

या आरोपींनी नऊ फेब्रुवारी २०१६ जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं.जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याने सध्या केंद्रातील सरकार आणि नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे.तो नेहमी भाजप आणि संघाविरोधात भूमिका मांडत असतो.

Loading...

दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. या सभेच्या शेवटी भाषण देण्यास उठलेल्या कन्हैया कुमारने उत्साहाच्या भारात राष्ट्रगीताने आपल्या भाषणाची सुरुवात केली. मात्र स्वत: कन्हैया कुमारच राष्ट्रगीतातील शेवटच्या ओळी विसरला. ही बाब सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली.

त्याचबरोबर ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभा या व्यतिरिक्तही इतर अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली. कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सहा-सात वर्षांच्या मुलाने देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चार ओळी ऐकवल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर कन्हैया कुमारने या मुलाला आपल्या जवळ बोलावून त्याला आलिंगण दिले.तर एकंदरीत कन्हय्या कुमार आणि विवादाचं नातं कायम राहिलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
प्रसिद्धीची पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना गरज नाही, देशमुखांनी आव्हाडांना झापलं