८६ कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी

औरंगाबाद-  शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी ८६ कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) मंजुरी दिली आहे. कचऱ्यावरील प्रक्रियेचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. त्यातला पहिला टप्पा सेग्रिगेशन किट तयार करण्याचा आहे. दुसरा टप्पा कंपोस्टिग पिट तयार करण्याचा असून, तिसरा टप्पा बायोमिथेनायझेशन प्लांट तयार करण्याचा आहे. या प्लांटसाठी ३० एकर जागा लागणार आहे. जागा मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘डीपीआर’बद्दल मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. बैठकीला नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते. ‘मुख्य सचिवांनी ८६ कोटींच्या ‘डीपीआर’ला मंजुरी दिली आहे. ८६ कोटींमध्ये ३७ कोटींचा महापालिकेचा हिस्सा आहे.
प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी जी झोननिहाय पंचसूत्री तयार करून दिली होती त्यानुसारच व कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावा असेही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.