सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक करत वसीम जाफरने दिला ‘हा’ टॅग

surya

श्रीलंका : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे.  यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली.

सूर्यकुमारच्या या खेळीवर या अर्धशतकी खेळीवर माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर यांनी ट्विट करुन सूर्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याला मिस्टर 360 चा टॅगही त्यांनी यावेळी दिला आहे. वसीम जाफर यांनी ट्वीट केले की, “सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली.”

सूर्यकुमार यादवच्या टी-20 कारकीर्दीतील हे त्याचे चौथे अर्धशतक होते.सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतासाठी चार टी-20 सामन्याच्या तीन डावात 46.33 च्या सरासरीने एकूण 139 धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा असून त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या