तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

मिलिंद नार्वेकर

मुंबई – देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते.  महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

तिरुपती देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सूचवतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींशी फोनवरून संवाद साधत, महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधून ट्रस्टच्या सदस्यपदासाठी मिलिंद नार्वेकर यांचं नाव सुचवल्याचं समजतंय. त्यानंतर आंध्र सरकारकडून या यादीत मिलिंद नार्वेकरांच्या नावाचाही समावेश करण्यात आलाय.

नार्वेकरांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून ओळखलं जातं. कोकणातील दापोलीत, समुद्रकिनारी असलेला मिलिंद नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करून, अवैधरित्या हा बंगला बांधल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या