महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्यासाठी चक्क भिकाऱ्यांची नेमणूक?

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बदनामी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता भिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईतील लोकल मध्ये राज्य सरकारची बदनामी करणारी गाणी गाऊन भीक मागणारे भिकारी दिसून आले असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील शाब्दीक युद्ध सुरू आहे. आरोप-प्रत्योरोपाच्या या भांडणात आता हा एक नवा आरोप जोडला गेलाय. मुंबईची जीवन वाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे या आरोपाच्या केंद्र स्थानी आहे. या लोकलमध्ये भिकारी गाणे गात असून त्यातून महाविकास आघाडी सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप सावंत यांनी केलाय.

वास्तविक काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारच्या कामांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी भिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दाखवले होते. त्याचा या आरोपाशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काहीही असो, या माध्यमातून राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या