fbpx

आजपासून महाराष्ट्रात सवर्ण आरक्षण लागू, राष्ट्रपतींची सवर्ण आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने १०% सवर्ण आरक्षणाची घोषणा केली होती. त्याप्रमाणेच फडणवीस मंत्रिमंडळानं देखील आजपासून सवर्ण आरक्षण लागू झाल्याच घोषित केलं आहे. आज सवर्ण आरक्षणा बाबतचा अध्यादेश काढला असून सवर्ण आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये लागू करण्यात आल आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज १० % सवर्ण आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली असून आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल आहे. महाराष्ट्र राज्याने सवर्ण आरक्षण देण्यास मंजुरी दिली होती. आता राष्ट्रपतींची या विधेयकावर स्वाक्षरी झाल्याने आता या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून देशातील शिक्षणसंस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना १० % आरक्षण देण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

या सवर्ण आरक्षणाचा फायदा खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या लोकांना होणार आहे. तसेच शिक्षण आणि नोकरीच्या संधी मध्ये हे १० % आरक्षण खुल्या वर्गातील लोकांना वरदान ठरणार आहे.

2 Comments

Click here to post a comment