गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा- शिवसेना

shivsena vs bjp

टीम महाराष्ट्र देशा- खाणींच्या प्रश्नावरुन गोव्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांना खाणींचा प्रश्न सोडवता येत नसल्याचा आरोप करत, गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

गोव्यातील खाणीच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत केंद्र सरकार गोव्यातील खाणकाम क्षेत्रात परराज्यातील लोकांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. गोव्यातील खाणी देशातील बड्या उद्योजकांना विकण्याचा केंद्र सरकारचा कट असल्याचा आरोप शिवसेनेचे गोव्यातील प्रमुख जितेश कामत यांनी केला आहे. खाणींवरील बंदीमुळे रोजगावार परिणाम होणार असून हॉटेलपासून ते वाहनखरेदी व सिनेमागृहांपर्यंत याचे परिणाम दिसून येतील, असा दावा त्यांनी केला.

खाणकामावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेने गोव्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ‘खाणींवर अवलंबून असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी भाजपाकडे मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थितीत सक्षम नेता नेता नाही. भाजपा नेते यावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.