कोरोना संकटात कर्तव्यावरील शिक्षकांना ५० लाखांचा विमा लागू करा, ‘प्रहार’ची मागणी

uddhav thackrey

अकोला : कोरोना संकटाच्या काळात शिक्षक वर्ग अध्यापना व्यतिरिक्त प्रशासनाकडून नेमून दिलेले कामे करत आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांनाही ५० लाखांच्या विम्याचे कवच प्रदान करावे अशी मागणी प्रहार शिक्षण संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.

याबाबत प्रहार शिक्षण संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध कामासाठी घेण्यात येत आहे. शिक्षकांना महसूल विभाग, आरोग्य विभाग ,निवडणूक विभाग आपल्या विभागाच्या कामासाठी जबाबदारी सोपवत असतो. पण सध्या शासनाने कोरोनासाठी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण प्रदान केले. पण याची मुदत ३१ डिसेंबर २०२० ला संपलेली आहे.

सध्या कोविडची दुसरी लाट आली असून, अजूनही शिक्षकांना काँटॅक्ट ट्रेसिंग, कॉल सेंटर, लसीकरण सर्व्हेक्शन ,नाक्यावरील तपासणी , कोविड सेंटरवर,माझे गाव माझी जबाबदारी अंतर्गत विविध ठिकाणी सेवा द्याव्या लागत आहेत. या काळात सेवा बजावताना दुदैवाने मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना मात्र विम्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना ५० लाखांची विमा रक्कम देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP