fbpx

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू, विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज दाखल करावेत : आशीष शेलार

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा : उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केला आहे. तर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ही हे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना या आरक्षणासाठी अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली आहे.

याबाबत शेलार म्हणाले की, उच्च न्यायालयाने आता मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण मान्य केले आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षण कोट्यात अर्ज दाखल केले नसतील त्यांनी अर्ज दाखल करावेत.त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे मराठा जातीचे प्रमाणपत्र नसेल त्यांच्या पालकांनी केवळ हमीपत्र द्यावे.

तसेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांना ही चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखल द्यावा लागणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी १२ टक्के आरक्षणानुसार पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई आणि अमरावती विभागात एकूण ३४ हजार २५१ जागा आहेत. पण त्यासाठी ४ हजार ५५७ एवढ्याच मराठा विद्यार्थ्यांनी आरक्षणाची नोंद केली आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

दरम्यान यंदाच्या वर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान मराठा अर्थात एस इ बी सी आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या इ डब्लू एस घटकाने प्रवेश प्रक्रिये दरम्यान आरक्षणाची नोंद केली नाही. त्यामुळे अनेक जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.