वाळू तस्करांवर मोक्का लावा-अजित पवार

नागपूर: “अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात महिला तहसीलदारावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू तस्करांवर मोक्का लावावा. अशा मस्तवाल गुंडांना कडक शासन करून अद्दल घडवायलाच हवी”. अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

दरम्यान,पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथे कुकडी नदीच्या पात्रात वाळू चोरी रोखून कारवाई करीत असलेल्या तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचा-यांच्या अंगावर डिझेल फेकून वाळू चोरांनी त्यांना पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. उपस्थित पोलीस कर्मचा-याने वाळू चोराच्या हातून काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

You might also like
Comments
Loading...