अॅपल एअरपॉडची किंमत 10,500 रुपये

अॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७ प्लस’ या दोन नव्या हँडसेटचे अनावरण केला. अॅपलचे हे फोन खास तर होतेच पण यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अॅपलच्या एअरपॉडची. वायरलेस असे हे इअरफोन होते.

आयफोनने नुकतीच आपल्या फोन व्यतिरिक्त इतर गॅझेटच्या किंमतीचे पेज अपडेट केले आहे. यात एअरपॉडची किंमत देण्यात आली आहे. हे एअरपॉड जर हरवले किंवा तुटले तर मात्र ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या एअरपॉडच्या पूर्ण सेटसाठी ग्राहकाला 10,500 मोजावे लागणार आहे. तर दुसरीकडे जर या एअरपॉडच्या जोडीमधला एका इअरफोन हरवला तर ग्राहकाला संपूर्ण जोडी विकत घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्याबदल्यात तो एक इअरफोन विकत घेऊ शकतो असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या एका इअरफोनसाठी ग्राहकाला साडेचार हजार मोजावे लागणार आहे.