Share

Apple iOS 16 Update | Apple ने नुकतेच आपले iOS 16 लाँच केले आहे, काय आहे त्यात विशेष जाणून घ्या!

Apple iPhone 14 लाँच होताच, Apple ने आपल्या नव्या iOS 16 घोषणा केली होती. iPhone नव्याच नाही तर जुन्या मॉडेल्समध्ये देखील iOS 16 उपलब्ध आहे. iOS 16 अपडेट मध्ये अनेक नवीन आकर्षक फीचर उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल:

या iPhone मॉडेल्स मध्ये आहे iOS 16 अपडेट 

Apple iPhone 13 Mini, Apple iPhone 13, Apple iPhone 13 Pro, Apple iPhone 13 Pro Max, Apple iPhone 12 mini, Apple iPhone 12, Apple iPhone 12 Pro, Apple iPhone 12 Pro Max, Apple iPhone 11, Apple iPhone 11 Pro, Apple, iPhone 11 Pro Max, Apple iPhone XS, Apple iPhone XS Max, Apple iPhone XR, Apple iPhone X, Apple iPhone 8 आणि Apple iPhone 8 Plus या iPhone मॉडेल्स मध्ये iOS 16 अपडेट उपलब्ध आहे.

Apple iOS 16 अपडेट

  • iPhone वापरकर्ते नव्या iOS 16 अपडेट व्दारे लॉक स्क्रीन कस्टमाईज करू शकतात. वापरकर्ते आपल्या लॉक स्क्रीनवर फोटो गॅलरी सेट करू शकता.
  • iOS 16 अपडेट नंतर वापरकर्ते लाईव्ह अॅक्टिविटी अपडेट आपल्या लॉक स्क्रीनवर बघू शकतात.
  • iOS 16 अपडेट मुळे वापरकर्ते आपली एक वेगळी आय क्लाऊड फोटो लायब्ररी बनवू शकतात. ही फोटो लायब्ररी तुम्ही पाच लोकांसोबत देखील शेअर करू शकता.
  • iOS 16 अपडेट मिळाल्यामुळे वापरकर्ते पाठवलेला 15 मिनिटांच्या आत मेसेज एडिट करू शकतात. आणि त्याचबरोबर 2 मिनिटांच्या आत मेसेज डिलीट देखील करू शकतात.
  • iOS 16 अपडेटमध्ये हेल्थ ॲपसाठी स्पेशल मेडिफिकेशन फीचर देण्यात आले आहे.
  • या अपडेट मध्ये सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे तुम्ही ईमेल शेड्युल करू शकतात.

Apple iOS 16 अपडेट कसे करावे

  • Apple iOS 16 अपडेट करण्यासाठी तुमच्या iPhone च्या Settings मध्ये जा.
  • Settings मध्ये गेल्यावर तुम्हाला तिथे General ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
  • त्यानंतर तुम्हाला Software Update पर्याय दिसले त्यावर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला पेजच्या एंडला असलेल्या Download and Install या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  • या प्रक्रियेनंतर तुमच्या iPhone मध्ये iOS 16 अपडेट होईल.

या नवीन iOS 16 अपडेट मध्ये Live Text फीचर देण्यात आले आहे. या फीचर च्या मदतीने फोन मधील फोटो सोबतच व्हिडिओ मधील टेक्स्ट सुध्दा तुम्हाला कॉपी किंवा ट्रान्सलेट करता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

Apple iPhone 14 लाँच होताच, Apple ने आपल्या नव्या iOS 16 घोषणा केली होती. iPhone नव्याच नाही तर जुन्या मॉडेल्समध्ये …

पुढे वाचा

Mobile

Join WhatsApp

Join Now