एसटी कामगारांचा संप चिघळण्याची चिन्हे

कामावर हजर व्हा अन्यथा कारवाई : सरकार

मुंबई : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जो बेमुदत संप पुकारलाय. त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, एसटीचा संप आणखी चिघळणार, अशी चिन्हं आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा अल्टिमेटम सरकारकडून देण्यात आला आहे. तसेच टीव्ही वृत्तानुसार, हजर न झाल्यास त्यांच्या बदली कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.यावर एसटी कामगारांने एक पाऊल मागे घेत आज पुन्हा सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

ऐन दिवाळीत एसटीचा संप सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठीची कालची बैठकही निष्फळ ठरलीय. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. कामावर रुजू न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे हे आवाहन धुडकावले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरुच राहिल अशी भूमिका घेतली आहे.

 

You might also like
Comments
Loading...