मुंबईकरांना आजही घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मुंबई : मंगळवारी झालेल्या पावसानंतर बुधवारी सकाळपर्यंत जनजीवन अजूनही विस्कळीत असल्याने मुंबईकरांनी  बुधवारीही घराबाहेर पडू नये असे आवाहन राज्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हवामान खात्याने बुधवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील व राज्यातील अन्य भागातील स्थितीवर जातीने लक्ष ठेवून आहेत.