डॉक्टरांचा संप अखेर मागे; बंद असलेल्या सेवा त्वरित सुरु करण्याचे आवाहन

doctor maharashtra

मुंबई  : देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. त्यानंतर खाजगी रुग्णालयातील बंद असलेल्या वैद्यकीय सेवा त्वरित सुरु करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सर्व खाजगी रुग्णालयांना करण्यात आले आहे.

आज सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा संप नियोजित होता. मात्र दुपारी तीनच्या सुमारास हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया बरखास्त करुन त्याजागी नॅशनल मेडिकल कमिशन आणण्यासंबंधी विधेयकावर लोकसभेत चर्चा होण्याच्या शक्यता आहे. याच्या निषेधार्थ देशातील डॉक्टर संघटनांनी बारा तासांचा बंद पुकारला होता.