नवलेखक अनुदानासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : ज्याचे आजपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे अनुदान देण्यात येते. यासाठी सन 2020 या वर्षासाठीच्या अनुदानासाठी नवलेखकांनी येत्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज पाठवावेत,असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.

नवलेखकांना खालील  सहा वाङमय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी खाली दिलेल्या पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकुराला अनुदान देण्यात येईल :

Loading...

कविता (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – 80 कविता), कथा (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द), नाटक/एकांकिका (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 28000 शब्द), कादंबरी (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द), बालवाङमय (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 28000 शब्द), वैचारिक लेख/ललितलेख/चरित्र/आत्मकथन/प्रवास वर्णन (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द)

(वर उल्लेखिलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास या मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही).

नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरुपात पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नवलेखकांनी त्यांचे साहित्य 27 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालवधीत पुढील पत्त्यावर पाठवावे.
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025. दूरध्वनी : 022-24325931

या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2020 माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली तसेच What’s New या अंतर्गत Navlekhaka Grant Scheme Rules Book and Application Form या शीर्षकाखाली तसेच मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'