सिंधुदुर्ग संग्रहालयासाठी चाळीस लाखाची मदत करण्याचे आवाहन

the Sindhudurg Museum

सावंतवाडी : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या शिवकालीन वास्तुसंग्रहालयाच्या पूर्ततेसाठी अवघ्या चाळीस लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. आपल्या पन्नास वर्षांच्या तपश्चसर्येतून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी जगभर हिंडून प्राप्त केलेला हा शिवकालीन खजिना सिंधुदुर्गाबाहेर जाऊ नये, अशी इच्छा असणार्या शिवर्प्रेमींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीचे मुघल साम्राज्य, अहमदनगरची निजामृशाही, विजापूरची आदिलशाही, मुरूड-जंजिर्यागचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज अशा यवनांच्या सत्तासंघर्षात संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. सिंधुदुर्गची भूमी ही याच इतिहासाचा एक भाग आहे. शिवरायांनी या भूमीत विजयदुर्ग किल्ला जिंकून घेत त्याची डागडुजी केली. सुरतेवर छापा घालून लुटून आणलेली संपत्ती सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीकरिता खर्ची घातली. आदिलशहाकडून रेडीचा यशवंतगड जिंकून घेत त्याची डागडुजी केली. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या पित्याचे शिवराय मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधले. छत्रपती शिवरायांचे असे मंदिर व शिवरायांच्या हाता-पायाचे ठसे फक्त सिंधुदुर्गातच पाहायला मिळतात.

Loading...

छत्रपती शिवरायांची सध्या इंग्लंडमध्ये असलेली भवानी तलवार महाराजांना याच भूमीतून मिळाली होती. सरखेल कान्होजी आंग्रेंनी बांधलेला देवगडचा किल्ला, बाराव्या शतकात बांधलेले राजा भोजचे किल्ले, सावंतवाडी संस्थानिक खेमसावंत राजांनी बांधलेला भरतगड असे अनेक गड येथे आहेत. या सर्व गोष्टी समृद्ध इतिहासाची साक्ष देत आहेत. हा ज्वलंत इतिहास आणि ठेवा पुढील पिढीसाठी जतन व्हावा, ही काळाची गरज आहे. नव्या पिढीला हा इतिहास परिणामकारकरीत्या समजावून देणे, सादर करणे यासाठीच हे देशातील पहिले शिवकालीन वास्तुसंग्रहालय बाबासाहेब पुरंदरेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिले आहे. शिवकालीन ऐतिहासिक वास्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून हे कार्य निश्चिदतपणे पार पडणार आहे.

ऐतिहासिक शिवकालीन कलादालन वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेले ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय असेल. संग्रहालयात शिवछत्रपतींच्या काळातील एक हजार तलवारी, पाचशे भाले, साडेतीनशे बंदुका, वाघनखे, दांडपट्टे, ढाली, तोफा, चिलखते, शिरस्त्राणे, तोफगोळे, शिवरायांची हस्तलिखित पत्रे, दुर्मिळ लिखित दस्तऐवज, शिवरायांना प्रत्यक्ष समोर बसवून देश-विदेशातील प्रख्यात चित्रकारांनी काढलेली महाराजांची तैलचित्रे ही या कलादालनाची वैशिष्ट्ये आहेत. शिवकालीन वस्त्रालंकार, सोन्या-चांदीच्या धाग्यांनी विणलेल्या पैठणी अशा अनेक मौल्यवान वस्तू या वस्तुसंग्रहालयात पाहता येणार आहेत.

या कलादालनात इतिहास अनुभवताही येणार आहे. पाश्चिमात्य म्युझियमच्या आधारावर येथेही मिनी थिएटर असेल, ज्यात कोकणातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, लढाया, येथील शूर योद्ध्यांच्या पराक्रमाच्या कथा चित्रफितीद्वारे दाखविल्या जाणार आहेत. छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या क्षणांचे जिवंत सादरीकरण करण्याची सोयही या कलादालनात उपलब्ध होणार आहे.

कसाल-मालवण मार्गावरील सुकळवाड येथे बाजारपेठेनजीक रस्त्याला लागूनच या वस्तुसंग्रहालयाची उभारणी गेली दोन वर्षे सुरू आहे. संग्रहालयाचे साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. सव्वा कोटी रुपये खर्चाच्या या कलादालनाचा ८० लाख रुपयांचा आर्थिक भार माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाने उचलला आहे. स्वत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. बाबासाहेबांनी आयुष्यभर भटकंती करून जमा केलेला अनमोल ठेवा या वस्तुसंग्रहालयासाठी दिला आहे. अशा या ऐतिहासिक कलादालनासाठी बाबासाहेबांचे योगदान, माजी आमदार उपरकर व त्यांच्या मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेले परिश्रम, शिवप्रेमी दात्यांचे योगदान यातून या संग्रहालयाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित कामासाठी अवघ्या ४० ते ५० लाखाची गरज आहे. हा भार उचलण्यासाठी मदत करण्याचे आवाहन शिवप्रेमींना करण्यात आले आहे.

या संस्थेची वेबसाइट www.shivsindhugarjana.com अशी असून ई-मेल [email protected] असा आहे. या संदर्भात सविस्तर माहितीसाठी ९४२२४३४४६७, ९४२२०५५३४८ किंवा ९४०५९२८८५३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश