दौंड येथील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

dound murder

पुणे : दौंड येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय कैकाडी महासंघाचेच्या वतीने जिल्हाधिकारी सौरव राव यांना निवेदन देण्यात आले आहे. दौंड परिसरात एसआरपीएफचा जवान संजय शिंदे याने तिघांवर गोळीबार केला होता. ह्या हत्याकांडमध्ये तीन तरुण मरण पावले होते.

पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाशभाऊ जाधव यांचे लहान बंधु अनिल जाधव यांचा सुद्धा मृत्यू झाला होता. हे क्रूत्य करणारा नराधम हा शासकीय सेवेत असतांना त्याने हे हत्याकांड शासकीय शस्रे वापरून केले. आणि तीन संसार उध्वस्त केले. निरागस बाळांना अनाथ केले. वयोवृद्ध मातापिता यांना नीराधार केले. अश्या नराधमाला कड़क शासन व्हावे वा या कुटुंबाला न्याय मिळावा, शासनाकडून मदत व्हावी त्या महिलांना शासनाने शासकीय सेवेत घ्यावे अश्या सर्व मागण्या अखिल भारतीय कैकाडी महासंघाचेच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी या वेळी अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे पदाधिकरि उपस्थित होते. श्री.मानसिंगराव जाधव, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री कैलास जाधव सर, प.महाराष्ट्र कार्याध्यक्ष, श्री.योगेश जाधव, श्री.सुशांत माने,श्री.प्रकाशभाऊ जाधव, श्रीमती.संगीता माने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.