लातूर :-जिल्हयातील सर्व शेतकरी / कुक्कुटपालकास अचानक मोठया प्रमाणात पक्षाची होणारी मरतुक (Mortality) आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त, लातूर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित क्षेत्रावरील खादय व पक्षाची वाहतूक, खरेदी-विक्री पूर्ण बंद करावी. उघडया कत्तलखान्यातून रोजची स्वच्छता व निर्जतुकीरण करावे. प्रत्येक गावातील ग्राम पंचायतीने धुण्याचा सोडा (Na2Co3) सोडियम कार्बोनेट याचे 1 लिटर पाण्यामध्ये 7 ग्राम या प्रमाणे द्रावण (युएसडीए या आंतरराष्ट्रीय संस्थेने शिफारस केल्या प्रमाणे) तयार करुन कोंबडयाची खुराडे, गुरांची गोठे, गावातील गटारे, नाल्या, पशुपक्ष्याचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर तात्काळ फवारणी करावी.
पुन्हा दर 15 दिवसाच्या अंतराने 3 वेळेस फवारणी करावी. यामुळे विषाणू, जीवाणू, माश्या ,गोचीड ईत्यादीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल.पाहुणे / स्थलांतरीत पक्ष (Migratory Birds) वन्य पक्षी, कावळे इत्यादींचा बर्ड फ्लू रोगाच्या प्रसारामध्ये महत्वाची भूमिका आहे. वन्य पक्षांची मर्तुणूक आढळल्या त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती दयावी. जिल्हयातील सर्व Poultry धारकांनी पक्ष्यांच्या आरोग्यासाठी मुलभूत जैवसुरक्षा उपाय व स्वच्छता बाबत पालन करणे गरजेचे आहे असे ही त्यांनी पत्रकात नमुद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सत्ताधाऱ्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन; पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द
- आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा
- दौंड शटल तातडीने सुरू करा; सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी
- सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी – उद्धव ठाकरे
- मेहबूब शेख यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने भाजप युवा मोर्चाने पुण्यात केली पोस्टरबाजी!