मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांच्या विरोधात याचिका

पुणे – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. मात्र मतदानाच्या वेळेस अनेक ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय बनली विरोधकांनी या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान हे प्रकरण ताज असतानाच, आता पालघर मधील ईव्हीएम मशिन्स बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रियेत झालेल्या गोंधळला मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांना जबाबदार धरून, त्यांच्या विरोधात पुण्यात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे

पत्रकार राजेंद्र सोनार यांनी ओम प्रकाश रावत यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.डी.मेश्राम यांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. लोकसभा मतदानामध्ये झालेल्या गोंधळामुळे समाजातील शांतता नष्ट होवून अशांतता निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण ही जनहित याचिका दाखल केल्याचं त्यांनी सांगितले.