‘एक-दोन नव्हे तर तब्बल १०७ आमदार करणार भाजपात प्रवेश’

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा नेते मुकुल रॉय यांनी एक अजब दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून सुमारे 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा मुकुल रॉय यांनी केला. कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला एक हाती सत्ता मिळाली. भाजप आणि मित्रपक्ष मिळून ३४० पेक्षा अधिक जागांवर विजय झाला आहे. तर केवळ भाजप ३०३ जागांवर विजयी झाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले. कॉंग्रेस तसेच इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

याचदरम्यान भाजप नेते मुकुल रॉय यांनी एक अजब दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून सुमारे 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या संभाव्य आमदारांची यादी आम्ही तयार केली असून, हे आमदार आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हंटले. रॉय यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.