‘७२ तासात माफी मागा, अन्यथा…’; अनिल परबांचा किरीट सोमय्यांना इशारा

anil parab

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर परब यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स देखील बजावला होता. परंतु आता आरोप करणाऱ्या सोमय्यांना योग्य ते उत्तर देण्यासाठी परब यांनी संपूर्ण तयारी केली आहे.

याबाबत बोलताना परब म्हणाले कि, ‘तथ्य नसलेल्या आरोपांमुळे सामान्य माणसांमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची विनाकारण बदनामी होत आहे.’ त्यामुळे परब यांनी तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत माझ्या आरोपांबाबत केलेले सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून परब यांनी सोमय्यांना दिला आहे.

येत्या ७२ तासात लेखी माफीनामा हा कमीतकमी दोन इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करावा आणि तुमच्या ट्विटर हँडलवर ते ट्विट करुन पीन करुन ठेवावं, असं अनिल परब यांनी नोटीसीमध्ये म्हटलं आहे. तसंच, अनिल परब यांच्याविरोधात जे ट्विट करण्यात आले आहेत ते सर्व ट्विट हटवावे, असं अनिल परब यांनी वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना सूचना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या