पुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार- आमदार जितेंद्र आव्हाड

jitendra avhad

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगामी काळात कोल्हापूर, अकोला आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले. हे आंदोलन१ मे रोजी होणार असून, पुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपतल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करण्याबाबत चर्चा झाली.

देशात विरोधकांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरु आहेत. देशात तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागले असतांना या विरोधकांच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस खासदार कुमार केतकर, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा,आणि आशिष देशमुख उपस्थित होते.