fbpx

“काहीही असो, वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे कायम सोबत”

टीम महाराष्ट्र देशा – “काहीही असो, वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे कायम सोबत असतो.”, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळी येथील गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

राजकारणात सतत या ना त्या कारणांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करीत असतात. काल हीच बहिण-भाऊ परळीमध्ये एकाच स्टेजवर आले होते. एरवी ही भावंडं एकमेकांची तोंड ही पाहत नाहीत. परंतु या दोघांच्या एका स्टेजवर येण्याने बीड जिल्ह्याच्या राजकारणात या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही भावंडं एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे व इंद्रजित भालेराव, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे प्रमुख पाहुणे होते.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शाळेतील सर्वात चांगली मुलगी होती. म्हणून मी कार्यक्रमालाही लवकर आले.” त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मात्र पंकजा मुंडेंना टोमणा मारला. “शाळेतील सर्वात चांगली मुलगी कार्यक्रमातून लवकर निघून जाते.” त्यावर उपस्थितांमध्येच एकच हशा पिकला.

2 Comments

Click here to post a comment