देशासाठी काहीपण! कोरोना योद्ध्यांनी ‘अशी’ केली नदी पार

लडाख

लडाख: संपूर्ण जगाला कोरोना महामारीमुळे अनेक संकटाना सामोरी जावे लागले आहे. देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने याचा प्रचंड भार डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर आला. तरीही न दमता, न थकता ते अहोरात्र झटत होते. अशा परिस्थितीत त्यांना पायाभूत सुविधांची कमतरता, संतप्त नातेवाईक अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नैसर्गिक संकटाना देखील समोरे जावे लागत आहे. असच चित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये दिसत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लडाखमध्ये नदी पार करण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली आहे. या फोटोत चक्क नदी पार करण्यासाठी कर्मचारी जेसीबीमध्ये बसलेले या फोटोत दिसत आहे.

लडाखच्या खासदाराने हा फोटो शेअर केला असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचं सोशल मिडीयावर कौतुक केलं जात आहे. हा फोटो ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘आपल्या कोरोना योद्ध्यांना सलाम, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कोरोना योद्ध्यांची टीम नदी पार करत आहे. घरीच सुरक्षित राहा आणि कोरोना योद्ध्यांना सहकार्य करा’, असे म्हणत त्यांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP