‘अल्ला-हो- अकबर’ ओरडले तर ठार करण्याचे महापौरांनी दिले आदेश

पर्यटनासाठी जगप्रसिद्ध अशा व्हेनिस शहराची शान असणाऱ्या सेंट मार्क्स स्वेअर परिसरात जर कोणीही ‘अल्ला-हो- अकबर’ ओरडले तर त्याला तिथेच गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रागान्रो यांच्यावर असा विचित्र आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे .
विचित्र निर्णयांमुळे ब्रोगान्रो चर्चेत येण्याची पाहिलीच वेळ नसून याआधीही त्यांनी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामधून समलिंगी संबंधांवर आधारित पुस्तकावर बंदी घालून वाद ओढावून घेतला होता.सध्या व्हेनिस शहराच्या महापौरांनी दिलेल्या वादग्रस्त आदेशामुळे सध्या इटलीतील राजकारण चांगलेच तापले आहे.आपल्या आदेशामध्ये ब्रोगान्रो म्हणतात,
‘जर कोणी सेंट मार्क स्वेअर परिसरात धावत प्रवेश करत असेल आणि ‘अल्ला-हो-अकबर’ असे मोठ्याने ओरडत असेल तर त्याला गोळ्या घालून ठार करण्यात यावे. सर्वांनाच ठाऊक आहे की ‘अल्ला-हो-अकबर’ हे शब्द अरबी भाषेमध्ये अल्लाहचे मोठेपण दाखवण्यासाठी वापरले जातात. मात्र मागील काही काळापासून घातपाताच्या घटना घडवून आणताना दहशतवादी ही घोषणा देताना दिसतात. म्हणूनच हा आदेश देण्यात येत आहे.’
हा आदेश म्हणजे ब्रागान्रो यांच्या राजकारणाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केल्यानंतर ब्रोगान्रो यांनी मी राजकारणात कायम बरोबर असू शकत नाही. मी चुकीचाही असेल पण अशा लोकांना आम्ही ठार करूच असेही सांगितले.

You might also like
Comments
Loading...