भाजप खासदाराची धमकी : “मोदींचा अपमान करणाऱ्याला जगातून गायब करू”

टीम महाराष्ट्र देशा– ‘आमच्या पंतप्रधानांचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही या जगातून गायब करु,’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मध्य प्रदेशामधील खासदार मनोहर ऊंटवाल यांनी विरोधकांवर टीका करताना केलं आहे.किसान सन्मान यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केलं.

गेल्याच आठवड्यात खासदार ऊंटवाल यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली होती. दिग्विजय सिंह दिल्लीवरुन आयटम घेऊन आले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य ऊंटवाल यांनी केलं होतं. मात्र त्यांनी अमृता सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. या विधानावरुन ऊंटवाल यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती.

You might also like
Comments
Loading...