‘जे जे कोणी आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकू’

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा – बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे कोणी आडवे येणार असतील, त्या सर्वांना एका बाटलीत बंद करुन मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून दिलं जाईल, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, एक महिला जेव्हा राजकारणात येते, तेव्हा काही लोकांना बाटलीत बंद करून ठेवण्याची गरज असते, त्यासोबतच काही लोकांना बाटलीतून बाहेर काढायची गरजही असते. आता, एक महिला व बालकल्याणमंत्री म्हणून मला ते चांगल समजतंय.

नगर परिषदेच्या अंतर्गत अमृत भुयारी गटार योजनेचे भुमिपुजन, नगरोत्थान सिंमेट रोडचे भुमिपुजन, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४४८ घरांच्या निर्मितीचे भुमिपुजन व मराठवाड्यातील पहिल्या निवारागृहाचे लोकार्पण तसेच नगर परिषद सभागृहाचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब सभागृह नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमानंतर मात्र शहरात राष्ट्रवादीच्या आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या नेत्यांना बोलवत राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला पहावयास मिळत आहे.

या कार्यक्रमाला पद्यश्री वामन केंद्रे, शब्बीर शेख, पैहलवान राहूल आवारे, क्रिकेटर सचिन धस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विक्रम काळे, आ. सुरेश धस, भिमराव धोंडे, आ. आर.टी.देशमुख, नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, विभागीय आयुक्त भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment