‘साहित्य संमेलनाला कुणीही येऊन वेठीस धरलेले चालणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : कुणीही येऊन साहित्य संमेलन वेठीला धरणार असेल तर ते चालणार नाही.साहित्यबाह्य प्रकरणांनी संमेलनात वाद निर्माण होणं आणि नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द होणं हे अत्यंत चुकीचे आहे. निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळींची चूक आहे. पण साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचं आहे, असे परखड मत ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.यावर्षीचे साहित्य संमेलन गाजले ते सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून पाठवण्यात आलेले निमंत्रण सुरक्षेचे कारण सांगून रद्द करण्यात आले होते.त्यावरून आयोजकांवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली.त्यानंतर आयोजक कुणाला उद्घाटक म्हणून बोलवते याबद्दल उस्तुकता लागून राहिली होती.अखेर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाने सावध पावले उचलत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीकडून उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढे बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘ज्ञानवंतांचे आवाज आज गहिरेपणाने ऐकण्याची गरज निर्माण झाली आहे. घडलेल्या प्रत्येक प्रकरणात फक्त शासन जबाबदार नसते, जगातील सर्व साहित्यिकांना मराठी साहित्याची दारं खुली आहे. आपल्याला शहाणं काम करणाऱ्या ज्ञानोपसकांची परंपरा आहे, आपल्याकडे डोंगरावएवढं काम केलेल्यांची परंपरा आहे. मात्र अशी माणसे आणि त्यांचं काम विस्मृतीत गेलं आहे. काय मोडीत निघालं आहे? काळाजी मागणी काय? याचंही भान माणसाने ठेवलं पाहिजे,असंही ढेरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.