पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाच्या वाट्याला येऊ नये : राजनाथ सिंग

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० सरकारने काढून टाकले आहे. तसेच या भागात शांतता व स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून काश्मीर आणि लडाख हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी पाकिस्तानचा मात्र तिळपापड झाला आहे. त्यांच्याकडून समझोता एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. तसेच व्यापारही थांबवण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या या धमकीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंग यांनी ७० वर्षापासून काश्मीर खोऱ्याला दिली जाणारी वागणुक केंद्र सरकारने कलम ३७०रद्द करून थांबवली आहे. याचं शेजारी राष्ट्राला दु:ख झालं आहे. यामुळे ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे अस राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना तुम्ही तुमचा मित्र बदलु शकता पण शेजारी बदलणं तुमच्या हातात नसतं. त्यामुळे पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाच्या वाट्याला येऊ नये असं म्हणत राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानच्या समझोता एक्सप्रेस आणि व्यापारासंबंधीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भारत सरकारच्या या निर्णयाचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेतही उमटले आहेत. पाकिस्तानच्या सभागृहातील काही मंत्र्यांनी युद्ध पुकारले पाहिजे अशी मागणी केली होती. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याला भारतावर हल्ला करण्याचे आदेश देऊ का असं उत्तर दिले होते.

 

#महापूर : सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, ३९० कैदी अडकले,दोघे पळाले