खून दरोडेखोरांना जामीन मिळतो, परंतु भुजबळ यांना जामीन मिळत नाही

bhujbal chagan

पुणे –  खून दरोडेखोरांना जामीन मिळतो, परंतु भुजबळ यांना जामीन मिळत नाही असा सवाल उपस्थित करत  शहर जिल्ह्यातून आलेल्या छगन भुजबळ समर्थकांची आज जंगली महाराज रोडवरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे ‘अन्याय पे चर्चा, एक दिवस भुजबळांसाठी’ बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ येत्या मार्च महिन्यात अधिवेशन काळात मुंबईमध्ये विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading...

भुजबळ समर्थकांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी डॉ. कैलास कमोद म्हणाले, मागील २३ महिन्यांपासून छगन भुजबळ यांना चौकशीच्या नावाखाली डांबून ठेवण्यात आले आहे. आजकाल खून दरोडेखोरांना जामीन मिळतो, परंतु भुजबळ यांना जामीन मिळत नाही. त्यांच्यावरील आरोप हे बिनबुडाचे असून सध्याचे सरकार भुजबळांशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.Loading…


Loading…

Loading...