कोणत्याही अडचणीत हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा असेल : रोहन देशमुख

तुळजापूर : मागील ५ वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने पाऊल उचलले असून, प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक स्तरातील लोकांची विकासाकडे वाटचाल सुरु आहे, तुळजापुरात ही विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत भाजप युवानेते रोहन देशमुख यांनी व्यक्त केले.

तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टी आयोजित रक्षाबंधनध कार्यक्रमात ते बोलत होते. ३००० भगिनींनी यावेळी रोहन देशमुख यांना राख्या बांधल्या. आपल्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी माझी तुम्हाला साथ असेल, मुलगा, भाऊ म्हणून सदैव आपल्या सेवेत पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही रोहन देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.

तुमचं आमचं नातं दृढ करणारा हा रक्षाबंधनाचा सण आहे. आपला विश्वास सार्थ करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन असे अशी भावनिक साद त्यांनी यावेळी माता भगिनींना घातली. आजपर्यंत लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून २५ हजार हुन अधिक बहिणींचे विवाह लावून सर्वसामान्यांना हातभार लावला, दत्तक योजनेतून होतकरू, गरीब विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य करत आहे, उद्योगासाठी नवउद्योजकांना साथ देत असल्याची माहिती रोहन देशमुख यांनी यावेळी दिली.

प्रसंगी हास्यसम्राट अशोक देशमुख यांनी रोजच्या कौटुंबिक व्यापात गर्क असलेल्या महिला भगिनींना विनोदी शैलीत आपल्या भाषणातून खळखळून हसवलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बालाजी शिंदे यांनी शासकीय योजना व लोकमंगलच्या गरजुंसाठीच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित महिलांना ओवाळणी म्हणून माहेरची साडी भेट दिली तसेच सर्वांच्या भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमास माजी नागराध्यक्षा संगीताताई कदम, गोवा महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद पाटील, कार्यकारिणी सदस्य रामदास कोळगे, भाजप जिल्हा पदाधिकारी प्रभाकर मुळे, निंबराज साळुंके, सत्यवान सुरवसे,प्रभाकर मुळे, अर्जुन कदम, संजय बताले, बाबा बेटकर, बालाजी शिंदे, सुखदेव, राजगुरु, नागेश चौगुले, पदाधिकारी आदी उपस्थित होते. गजानन वडने यांनी आभार मानले, संतोष नाईक यांनी सूत्रसंचालन केले.