बीड: बीड येथील शेतकरी मेळाव्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या, “संजय राऊत यांनी युतीबाबत केलेल्या विधानावर मी टिप्पणी करू शकणार नाही. पण त्यांच्या भावनेला पक्षातील पक्षाध्यक्ष आणि पक्षातील निर्णय घेणारे इतर नेतेच उत्तर देतील, असं सांगतानाच राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे”, असं सूचक विधान त्यांनी केले आहे.
युतीबाबतचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मोठं विधान केलं होतं. भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखाद्या भूमिकेवरून शिवसेना माघार घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं आहे.
पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदाम इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. यानिमित्ताने विकास कामांचे उदघाटन, विविध परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळाव्यास त्यांनी संबोधित केले.
महत्वाच्या बातम्या –