Share

IPL 2023 | ‘या’ खेळाडूला टीममध्ये घेण्यासाठी RCB मोजू शकते कितीही पैसे

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. आयपीएल 2023 मध्ये शिखर धवन पंजाब किंग्स या संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. तर त्याचवेळी एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ((Royal Challengers Bangalore)) या संघामध्ये सामील झाला आहे. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी (RCB) आपले खेळाडू रिटेन करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. त्याचबरोबर आरसीबी टीम एका खेळाडूला मिनी ऑक्शन मध्ये टार्गेट करण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये RCB या खेळाडूला करू शकते टार्गेट 

आयपीएल 2023 साठी आरसीबी मयंक अग्रवाल या खेळाडूला टारगेट करू शकते. कारण आरसीबीला फॅब डुप्लेसीसह स्पेशलिस्ट सलामीवीराची गरज आहे. मयंक अग्रवाल हा एक सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. त्यामुळे आरसीबी मयंक अग्रवालला टार्गेट करू शकते. आयपीएल 2022 मध्ये आरसीबी डुप्लेसी आणि अनुज रावत या दोन सलामीवीरांसह आपल्या सामन्याची सुरुवात करत होते. पण अनुज रावत आयपीएल 2022 मध्ये काही विशेष फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे आरसीबीला आपला सलामीवीर बदलण्याची गरज वाटू लागली आहे.

आयपीएल 2023 पूर्वी पंजाब किंगने शिखर धवनला कर्णधार पदावर बसून मयंक अग्रवालला त्या पदावरून हटवले आहे. अशा परिस्थितीत पंजाब किंगने मयंक अग्रवाल सोडल्यावर आरसीबी त्याला आपले टार्गेट करू शकते.

आयपीएल 2022 मध्ये मयंक अग्रवालने 13 सामन्याच्या 12 डावांमध्ये फक्त 196 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल आयपीएल 2021 मध्ये पंजाबच्या त्यात संघात एक खेळाडू म्हणून खेळला होता. 2021 मध्ये त्याने 12 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने 141 धावा केल्या होत्या. यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की मग अग्रवाल एक उत्तम सलामीवीर आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपल्या रिटेन खेळाडूंची यादी …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now