चिंता मिटली.. चीनचं शक्तीशाली रॉकेट ‘या’ ठिकाणी कोसळले

चीन रॉकेट

बीजिंग : चीनने २९ एप्रिलला तियान स्पेस स्टेशन बनवण्यासाठी सगळ्यात मोठे रॉकेट ५बी अवकाशात सोडले होते. मागील वर्षी चीनमधील अंतरिक्ष केंद्रावरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं. मात्र अमेरिकन मिलिटरीने चीनचं रॉकेट कधी कोसळणार याबाबतचं भाकीत केलं होतं.  चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं आणि अवकाशात निष्क्रिय झालेलं रॉकेट लाँग मार्च ५ बी हिंदी महासागरात कोसळलं आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चीनचं हे शक्तीशाली रॉकेट भारताच्या दक्षिणपूर्व भागात श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास हिंदी महासागरात कोसळलं आहे .पृ्थ्वीच्या वातावरण कक्षेत शिरत असताना रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉकेटचे अवशेष मालदीवच्या हद्दीत कोसळले आहेत.  अमेरिकन स्पेस फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, हे रॉकेट १८ हजार मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होते. मॉड्यूलला निर्धारित कक्षेत सोडण्यात आल्यानंतर याला नियंत्रित पद्धतीने जमिनीवर यायचं होतं. पण, चीनच्या स्पेस एजेन्सीचं या रॉकेटवरील नियंत्रण सुटले.

रॉकेटचा हा तुकडा जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता अधिक होती.  आतापर्यंतच्या अंदाजानुसार हे रॉकेट दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियाजवळ कोसळण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

IMP